बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपट अभिनेता चेतनने ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद याविषयी निंदनीय विधान केल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, विप्र युवा वेदिकेचे पवन कुमार शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.चेतन यांनी ब्राह्मणवादावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट नुकतीच व्हयरल केली होती. चेतनने समाज म्हणून आपल्याला लढा देण्याची गरज कशी आहे असे स्पष्ट करून समाज म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात नव्हे तर ब्राह्मणवादाच्या विरोधात असल्याचे म्हंटले होते.
कन्नड चित्रपटाचे अभिनेते चेतन यांचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद याविषयी निंदनीय विधान केल्यामुळे मंत्री शिवाराम हेब्बर यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, चेतन यांच्या पोस्टमुळे अनेक ब्राम्हण लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे ब्राह्मण विकास मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद मूर्ती त्यांनी अभिनेता चेतनविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्त कमल पंत यांच्याकडे केली. दरम्यान, बसवणगुडी पोलिसांनी विप्र युवा वेदिकेचे पवन कुमार शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे चेतन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.