बेंगरूळ/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यासह राजधानीत कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्व ते प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर बृह बेंगरूळ महानगर पालीकेने (बीबीएमपी) सोमवारी लोकप्रिय कन्नड अभिनेता रमेश अरविंद यांची कोरोनाव्हायरसबद्दल अचूक माहिती प्रसारित करण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्ती केली आहे.
सोमवारी बीबीएमपी कमिशनर एन. मंजुनाथ प्रसाद यांनी रमेश अरविंद यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आणि शहरातील कोविड -१९ साठी नव्याने स्थापन झालेल्या बीबीएमपी कोविड -१९ टास्क फोर्समध्ये रमेश यांचा समावेश केला आहे.
कोरोनाबद्दल जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी रमेश यांची बीबीएमपी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितले आहे.