बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसेंदिवस कॉर्न रुग्ण वाढत आहेत. अनेक अधिकारी, राजकीय नेते आणि अभिनेते व अभिनेत्री यांना कोरोनाची लग्न झाली आहे. यामध्ये कन्नड चित्रपट अभिनेत्री आणि अभिनेता अर्जुन सरजा यांची मुलगी ऐश्वर्यालाही कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. कोरोना तपासणीनंतर तिचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळले.
तिने सोशल मीडियावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. तसेच मी व्यावसायिक वैद्यकीय पथकाच्या निर्देशानुसार सर्व आवश्यक काळजी घेत आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले, कृपया त्यांनी स्वतःची काळजी घ्या. असे अभिनेत्री ऐश्वर्याने म्हंटले आहे.
गेल्या आठवड्यात तिचा चुलत भाऊ अभिनेता ध्रुव सरजा आणि त्याची पत्नी प्रेरणा सरजा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.