कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार किच्चा सुदीप याचा ‘विक्रांत रोना’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील सुदीपसोबत दिसून येणार आहे.
सुदीपने जॅकलीनसोबतची दोन छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत. ‘विक्रांत रोना’मध्ये किच्चा सुदीपसोबत चित्रिकरण करण्याचा अनुभव खूपच चांगला होता असे जॅकलीने म्हटले आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोना संकटामुळे हे प्रदर्शन लांबणीवर पडल्याचे मानले जात आहे.
या चित्रपटात जॅकलीन कॅमियो रोल साकारताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनूप भंडारी यांनी केले आहे. जॅकलीनचा हा पहिला दक्षिण भारतीय तसेच कन्नड चित्रपट असणार आहे. ‘विक्रांत रोना’ एक फॅन्टसी चित्रपट असून यात ऍक्शन आणि थ्रिलर पहायला मिळणार आहे.