राष्टीय जनता दलाचा आरोप, सिद्धूशी केली तुलना
मुझ्झफरनगर / वृत्तसंस्था
नवज्योतसिंग सिद्धू यांनी ज्या प्रमाणे काँगेससमोर संकटांची मालिका उभी केला, त्याचप्रमाणे कन्हैया कुमारही काँगेसचा नाश करेल, अशी भविष्यवाणी काँगेसचाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केली आहे. काँगेस ही एक बुडती नौका आहे. त्यामुळे कन्हैया कुमार किंवा कोणीही या पक्षात प्रवेश केला तरी काही फरक पडणार नाही, असे या पक्षाचे नेते शिवानंद तिवारी यांनी प्रतिपादन केले.
काँगेस हे एक मोठे जहाज आहे आणि ते वाचविण्याची आवश्यकत आहे. काँगेसची देशाला आवश्यकता आहे, अशी विधाने कुमार यांनी काँगेस प्रवेशानंतर केली होती. त्यासंबंधी तिवारी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. काँगेस मोठे जहाज असले तरी ते आता बुडू लागल्याने त्याला वाचविणे कोणालाही शक्य होणार नाही. काँगेसला कोणतेही भवितव्य उरलेले नाही, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
काँगेसने राष्ट्रीय जनता दलाशी युती करुन 2020 मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक लढविली होती. तथापि, काँगेसची कामगिरी अत्यंत सुमार झाल्याने या ‘महागठबंधन’ ला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. काँगेसने तिच्या क्षमतेपेक्षा जास्त जागा लढविल्या होत्या पण जिंकण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. परिणामी महागठबंधनाला काही जागा बहुमतासाठी कमी पडल्या होत्या. त्यामुळे युतीचा पराभव काँगेसमुळे झाला अशी टीका आजही होत आहे. अशा परिस्थितीत काँगेसचा मित्रपक्ष असलेल्या राजदने पेलेली ही टीका महत्वाची आहे.