प्रतिनिधी/ बेळगाव
एसपीएम रोड येथील कपिलतीर्थ मंडळाच्या युवकांनी नुकतीच गडकोट मोहीम पूर्ण केली. पुणे येथील गडांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱया राजगडावर मंडळाच्या धारकऱयांनी एक दिवसाचा मुक्काम केला. गडावरील पद्मावती मंदिर, सदर, बालेकिल्ला, चोर दरवाजा, पालीमार्ग, सुरेला माची, संजीवनी माची यांची धारकऱयांनी माहिती करून घेतली.
यावेळी रमेश रेमाण्णाचे, अभिषेक पाटील, अभय दावतर, बाहुबली बखेडी, किरण चव्हाण, विघ्नेश कुटे, रूपेश जुवेकर, अक्षय दावतर, ऋतिक लोहार, रितेश हुलीयार, साहिल मुरकुंबी, सूरज कुंडेकर, प्रसाद जाधव, विकी जुवेकर, प्रशील लोहार, निखिल पठाणे, जयदीप उपसकर यासह इतर सहभागी होते.