प्रतिनिधी /बेळगाव
क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी आरास करण्यात आली होती. विठ्ठलाचा मुकूट परिधान केलेले शिवलिंग, टाळ, मृदंग, वीणा हे संपूर्ण साहित्य वापरून तसेच विविध फुलांच्या पाकळय़ा वापरून सुंदर अशी आरास करण्यात आली. यासाठी आर्टिस्ट वसंत पाटील व मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व धार्मिक विधी, रुद्राभिषेक व पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले.
यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्राr, राजू भातकांडे अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, राजू पाटील, गणेश देवर, बसवनगौडा पाटील आदी ट्रस्टी सेवेकरी भक्तगण उपस्थित होते. सायंकाळी पालखी प्रदशिक्षणा आणि विशेष महाआरती झाली.