प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शनिवारी नवचंडी होम करण्यात आला. मंडल पूजन, नवग्रह पूजन, गणेश पूजन, दुर्गा सप्तश्रृती वाचन करून यज्ञाला सुरुवात झाली. रविवार दि. 25 रोजी सायंकाळी पालखी प्रदक्षिणा करण्यात येणार आहे.
यज्ञाचे पौरोहित्य चेतन व संतोष गुरुजी यांनी केले. मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, अभय लघाडे, विवेक पाटील, जयश्री भातकांडे, रेवती चव्हाण, पवित्रा कुरणे यांच्या हस्ते यज्ञ पार पडला. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष सतीश निलजकर, दौलत साळुंखे, अविनाश खन्नुकर, दौलत जाधव, राकेश कलघटगी, अनिल मुतगेकर आदी उपस्थित होते.