प्रतिनिधी / बेळगाव
अक्षय्य तृतियेच्या शुभ मुहूर्तावर येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शिवपिंडीला एकूण 1001 आंब्यांनी आकर्षक आरास करण्यात आली होती. सलग तिसऱयावषी तानाजी गल्लीतील प्रसिद्ध आर्टिस्ट वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनातून आंब्यांची आरास करण्यात आली. तसेच यावेळी भगवान परशुराम जयंतीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लादल्याने मंदिरेदेखील बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व मंदिरांमध्ये मर्यादित स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती.
याप्रसंगी कपिलेश्वर मंदिर आंब्यांच्या सुगंधाने दरवळून गेले होते. यावेळी राजू भातकांडे, विवेक पाटील, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, सचिन आनंदाचे, गणेश देवर यांच्यासह ट्रस्टी व भाविक उपस्थित होते.