प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला मराठी अभिनेते व लेखक विकास पाटील यांनी नुकतीच भेट दिली. विकास पाटील हे सध्या ‘जीव झाला वेडा पिसा’ या मालिकेमध्ये जलवा तर स्वामी समर्थ या मालिकेच्या संवाद लेखनाचे काम करत आहेत. लवकरच बेळगाव परिसरामध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी बेळगावची पाहणी केली.
या चित्रपटातील काही भाग कपिलेश्वर मंदिर परिसरात चित्रीकरण केला जाणार असल्याने मंदिर परिसराची पाहणी त्यांनी केली.
यावेळी देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, राकेश कलघटगी, अभय लगाडे, अनिल मुतकेकर यासह भाविक उपस्थित होते.