प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने कोरोना काळात रुग्णवाहिकेची मोफत सेवा देण्यात आली. बेळगावमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सामाजिक संघटनांनी रुग्णांसाठी रुग्णवाहिका तयार केल्या. परंतु उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलेसिस, पॅरालेसिस, गरोदर स्त्रिया, सांध्याचे आजार असणाऱयांना समस्या येत होत्या. या काळात कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने उत्तम सेवा दिली. या काळात 157 रुग्णांना उपचारासाठी पोहचविण्यात आले.
नागरमुन्नोळी, मुरगुड, संगोळ्ळी या भागात बेळगाव परिसरातील रुग्णांची ने-आण करण्यात आली. ट्रस्टच्यावतीने आक्सिजनचा पुरवठा, धान्य वाटप, अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांताई वृद्धाश्रमाने ही रुग्णवाहिका ट्रस्टला उपलब्ध करून दिली. अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, ट्रस्टी अभिजीत चव्हाण, राजू भातकांडे, विवेक पाटील, राहुल कुरणे, सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, दौलत जाधव आदी मेहनत घेत आहेत.