वार्ताहर / कबनूर
कबनूर येथील यशोलक्ष्मी कॉलनी परिसरातील नव्याने कोरोना संसर्ग रोगाचे आठ रुग्ण आढळून आले होते. त्यातील एका 65 वर्षे पुरुषांचा मंगळवारी मृत्यू झाला. दुसऱ्याला लाटे तील हा पहिला बळी आहे. तेथील कोल्हापूर रोड वरील यशोलक्ष्मी कॉलनी परिसरात असलेल्या एकाच घरांमध्ये कोरोना रोगाचे आठ रुग्ण आढळले होते एकाच घरातील 8 जणांपैकी दोन जणांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . दाखल करण्यात आलेल्या दोन पैकी 65 वर्षीय पुरुषाचा मंगळवारी मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू आहे.उर्वरित सहा जणांना होम क्वारंनटाइन करण्यात आले आहे.
त्याच घरातील लहान मुले व मोलकरणी सह तिघांचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत ते अद्यापही मिळालेला नाही अशी माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या आठ महिन्यापूर्वी गावांमध्ये 320 कोरोना रोगाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेत नव्याने11 रुग्ण आढळून आले होते. आता एकूण संख्या 331 वर जाऊन पोहोचली आहे. या परिसरात 11 रुग्ण आढळून आले तरीसुद्धा आरोग्य विभागाकडून पण तीन मिनिट अजून जाहीर झालेली नाही. कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.