वार्ताहर / कबनूर
दिवाळीनंतर कबनूर मधील दोन वेगवेगळ्या भागात दोन महिला कोरोना सदृश रुग्ण आढळून आलेआहेत. यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसऱ्या महिलेवर खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत. कबनूर येथील वा करेकर मळ्यामध्ये एक महिला व इचलकरंजी कबनूर रोडवरील सरस्वती कॉलनीत एक महिला महिलेला कोरोना संसर्ग रोगाची लागण झालेले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाखरेकर मळ्यातील 35 वर्षे महिलेला बाळंतपणासाठी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात तिची तपासणी केली असता तिला कोरोना संसर्ग रोग झाल्याचे आढळून आले. या महिलेवर या दवाखान्यात उपचार चालू आहेत. तसेच सरस्वती कॉलनीतील एका 59 वर्षे महिलेला आयजीएममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला मृत्यू नंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले. आज अखेर गावात एकूण तीनशे वीस रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये दिवाळीनंतर 320 पैकी 318 बरे झाले आहेत. सध्या एका महिलेवर उपचार चालू आहे. दिवाळीनंतर तरुणाने एका महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आज अखेर एकूण 34 रुग्ण को रो ना ने मरण पावले आहेत.