वार्ताहर / कबनूर
आझाद नगर मधील संतप्त नागरिकांनी आज सरपंच व उपसरपंच यांच्या दालनात दोन मृत्यू डुकरे टाकली. ग्राम विकास अधिकारी दालन जवळ येताच संतप्त नागरिकांनी घेराव घालून. जाब विचारला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली. उघड्यावर डुकरे मरून पडल्याचे आढळून आले. डुक्कर मालक व भागातील नागरिकांच्या वादावादी व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळले. कबनुर तालुका हातकणंगले येथील आझाद नगरात आज सकाळी डुकरे मरून पडली होती. औषध घालून मारून टाकला असे डुक्कर मालकाने नागरिकांना सवाल करून अर्वाच्य शब्द वापरल्याने भागातील नागरिक व डुक्कर मालक यांच्यात वादावादीचे प्रकार घडले डुकरे नागरिकांच्या घराजवळ आणून टाकले. भागातीलनागरिकांनी सरपंच सुनील स्वामी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला परंतु त्यांच्याशी संपर्क झाला नाही. या भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली ग्रामपंचायत मधील संबंधितांनी पोलिसात तक्रार करा त्या नंतर बघू असे सांगितले. ग्रामपंचायतीने लेखी तक्रार देण्याची मागणी केली.
नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसात जाऊन तेथे घडलेल्या घटनेची माहिती दिली हा विषय आमच्याकडे येत नसून ग्रामपंचायतीच्या संबंधित विषय आहे असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत व पोलिसांनी मनावर न घेता टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच संतप्त नागरिकांनी दोन मृत डुकरे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या दालनात आणून टाकले. नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा धिक्कार करून विरोधात घोषणा देऊन गोंधळ घालू लागले. दरम्यान ग्राम विकास अधिकारी बी. टी. कुंभार व सदस्य बलरामभोजने येताच त्यांना घेराव घातला व भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे डुकरांचा नागरिकांना त्रास होत आहे. ग्रामपंचायत कारवाई का करत नाही असा जाब विचारला.पोलिसात तक्रार करा पुढे आम्ही पाहून घेऊ असे सांगण्यात आले. तरीसुद्धा गोंधळ सुरू राहिले. दरम्यान ग्राम विकास अधिकारी व नागरिक व सदस्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना उघड्यावर मृत डुकरे पडल्याचे दिसून आले.
यावेळीसुद्धा नागरिकांनी त्या भागातील गाऱ्हाणी अधिकारी यांच्यासमोर मांडले .ग्रामविकास अधिकारी बी टी कुंभार यांनी संबंधितावर कारवाई करण्याची ग्वाही दिली. अमेरिकन नागरिक शांत झाले होते. दरम्यान घटनास्थळी मालकांश काही संबंधित आल्यानंतर दोन्ही गटात गोंधळ सुरू होऊन वादावादी व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला शिवाजी नगर पोलिसाचा कुमक दाखल झाला . अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.