साहित्य : कबाबः अर्धी वाटी पालक चिरून, पाव वाटी मैदा, 2 चमचे चणाडाळ, 1 चमचा लसूण चिरून, 1 चमचा आलं पेस्ट, 1 हिरवी मिरची चिरून, पाव वाटी वाफवलेले मटार, पाव वाटी पनीर खिसून, मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, 2 चमचे बेडक्रम्स, रोलसाठी बेडक्रम्स, तेल तळण्यासाठी, ग्रेव्हीः 2 वाटी पालक चिरून, 1 वाटी मेथी चिरून, 1 चमचा तेल, पाव वाटी कांदा चिरून, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे क्रीम, मीठ, चीज.
कृती : मैद्यामध्ये पाणी घालून बॅटर बनवावे. चणाडाळ तासभर भिजत घालून निथळावी. त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि पाणी घालून शिजवावे. गार झाली की त्यात पालक आणि मटार मिक्स करावे. नंतर इतर साहित्य घालून कबाब बनवावेत. कबाब मैद्यामध्ये घोळवून बेडक्रम्समध्ये घोळवून 20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावेत. नंतर गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. गरम पाण्यात पालक-मेथी टाकून शिजवावी. निथळून त्यावर गार पाणी ओतून मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. गरम तेलात कांदा आणि लसूण पेस्ट टाकावी. नंतर पालक-मेथी पेस्ट व इतर साहित्य टाकून शिजवावे. थोडे गार झाले की त्यात कबाब व चीज सजवून नान अथवा भातासोबत द्या.