ऑनलाईन टीम / भोपाळ :
अल्पमतात आलेल्या मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारला आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मध्यप्रदेशातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात गेल्याने न्यायालयाने आज विशेष अधिवेशन बोलावून कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांना दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रजापती यांनी गुरुवारी रात्री काँग्रेस आमदारांचे राजीनामे स्विकारले. आज बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याने कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या असून, हे सरकार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विधानसभेतील बहुमत चाचणीची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या संदर्भातील निर्णय दिला. तसेच बहुमत चाचणीचे चित्रीकरण करण्याचे आणि शक्मय असल्यास बहुमत चाचणीचे थेट प्रसारण करण्याचेही आदेशही खंडपीठाने दिले आहेत. तसेच बंडखोर 16 आमदारांच्या सुरक्षेसंदर्भातील आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.