ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद मागील काही दिवसांपासून रिक्त आहे. त्यावेळी पासून रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाला कार्यकारी अध्यक्ष पद देण्यासाठी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कमलनाथ हे दिल्लीतील जनपथ 10 इथे पोहचले असून ते सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती सतत कमी जास्त होते असल्याने नव्या अध्यक्षांचा शोध सुरू आहे. मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग फार कमी आहे. नुकतेच त्यांनी 5 राज्यांमध्ये बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पॉंडेचरी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील सहभाग घेतला नव्हता.