दोडामार्ग / वार्ताहर:
कोनाळकट्टा येथील कमलाकांत भिकाजी कर्पे (वय 82) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्याच्या पश्चात्य दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. व्यवसायिक तथा उद्योजक अभिजित कर्पे यांचे ते वडील होत. त्यानी बरीच वर्षे तिलारी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पाट्ये शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या कुटुंबियांचे अनेकांनी भेट देऊन सांत्वन केले.