प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनाच्या सरासरी 3 हजार चाचण्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. यामुळे रूग्णसंख्या कमी दिसत असली तरी भविष्यात तिसऱया लाटेचा धोका निर्माण झाला आह़े जिल्हा आरोग्य अधिकारी ड़ॉ अनिरूद्ध आठल्ये यांनी गणपती उत्सवानंतर कोरोना चाचण्या वाढविण्याचे सांगितले होत़े मात्र नवरात्र उत्सव जवळ आला तरी कोरोना चाचण्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे कमी चाचण्या तिसऱया लाटेला आमंत्रण देत आहेत, असे बोलले जात आह़े दरम्यान जिल्हय़ात कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 30 सप्टेंबर रोजी एका दिवसात विक्रमी 35 हजार 939 जणांना डोस देण्याची कार्यवाही जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नव्याने 72 कोरोनाबाधित रूग्ण आढळल़े तर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा शुक्रवारी जिह्यात कोरोनाच्या 2 हजार 760 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 357 चाचण्यांपैकी 33 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 403 पैकी 39 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यामध्ये मंडणगड-1, दापोली-5, खेड-3, गुहागर-5, चिपळूण-8, संगमेश्वर-10 रत्नागिरी-23, लांजा-11 तर राजापूर-6 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 78 हजार 234 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.43 इतका आह़े तर शुक्रवारी 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये गुहागर-1, संगमेश्वर-1 व खेड-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 65 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 941 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के इतके आह़े तर 697 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यात केवळ 253 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत़
आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरणाची वेगवान कार्यवाही
जिल्हय़ात कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 30 सप्टेंबर रोजी एका दिवसात विक्रमी मात्रा देण्यात आल्या. 160 विविध लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा मिळून 35 हजार 939 जणांना डोस देण्याची कार्यवाही जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आली. जिल्ह्य़ात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसी नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
राज्य शासनाकडून जिल्हय़ासाठी सध्या लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा सुरु आहे. पुणे येथून दिवसाला मिळणाऱया डोसची संख्याही वाढत आहे. 30 सप्टेंबर रोजी एका दिवसात 26 हजार 123 जणांना पहिला तर 9 हजार 816 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली. दिवसभरात 35 हजार 939 जणांना डोस देण्यात आले. 18 वर्षांवरील 11 लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
एकूण 10 लाख 48 हजारजणांचे लसीकरण पूर्ण
जिह्यात आतापर्यंत 7 लाख 31 हजार 161 जणांना पहिला आणि 3 लाख 17 हजार 721 जणांना दुसरा डोस अशा एकूण 10 लाख 48 हजार 882 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले.
दापोलीतील पिसई आरोग्य केंद्रात संशयास्पद लसीकरण
दापोलीः तालुक्यातील पिसई आरोग्य केंद्रात 4 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कोविड लसीकरणाची कुठेही कागदोपत्री नोंद नसल्याने हे लसीकरण संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे माजी सभापती राजेश गुजर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. यामुळे खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडे या बाबत लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.
पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 सप्टेंबर रोजी 150 लसी प्राप्त झाल्या होत्या. या लसी लगतच्या करंजाणी गावासाठी असल्याचा तोंडी निरोप आरोग्य खात्याकडून आरोग्य कर्मचाऱयांना प्राप्त झाला होता. मात्र या बाबतची नेहमीप्रमाणे लेखी प्रेस नोट अद्याप काढली गेली नाही. या गंभीर बाबीवर बोट ठेऊन माजी सभापती गुजर यांनी सभागृह दणाणून सोडले. दापोली तालुक्यात जिथे-जिथे लसीकरण होते तिथे प्रेस नोट काढून ती व्हॉट्सऍप ग्रुपवर टाकण्यात येते. असा नियम असतानाही तब्बल 150 ग्रामस्थांना कोणत्याही कागदावर नोंद नसताना लस कशी दिली गेली, ही लस कुणामार्फत देण्यात आली? या लसीचे उत्तरदायित्व कुणाचे? अशा प्रश्नांची सरबत्ती गुजर यांनी केली. यामुळे या लसीकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून ही लस खरी होती की बोगस, असा प्रश्नही गुजर यांनी उपस्थित केला आहे. यामुळे गोंधळ उडाला.
यावेळी सभागृहात आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी अनुपस्थित होते. यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना व पत्रकारांना पाचारण करण्यात आले. या बाबत माहिती देताना तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. मार्कंड यांनी ही लस कोणत्याही प्रकारची नोंद नसताना दिली केल्याचे मान्य केले. मात्र आपल्याला वरिष्ठांनी या बाबत दूरध्वनीवरून कळवले होते व लस देण्याचे आदेश दिले होते, असेही सांगितले. या बाबत बोलताना पिसई आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. पी. एम. भागवत यांनीही आपल्याला वरिष्ठांनी दूरध्वनीवरून लस देण्याबाबत सांगितले होते, असे सांगितले. मात्र या बाबत कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश अथवा सूचना आपल्याला प्राप्त झालेली नसल्याचा खुलासा केला. यावर संतप्त झालेल्या सभागृहाने अशी विनानोंदणी लस कोणाच्या आदेशाने देण्यात आली, या बाबतचा लेखी खुलासा 24 तासांच्या आत पंचायत समितीच्या सभापतीकडे करावा, असा आदेश सभागृहाने आरोग्य विभागाला दिला.