ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असताना आज कमोडिटी बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 1504 रुपयांनी वधारले.
जगावर आर्थिक मंदीचे ढग दाटल्याने गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल आहे. आज मल्टी कमोडीटी बाजारात सोने 1504 रुपयांनी वधारून 45 हजार 226 रुपयांवर पोहचले. चांदीच्या दरातही प्रती किलो 2 हजार 212 रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव प्रती किलोला 45 हजार 435 रुपये झाला आहे.
जगभरातील केंद्रीय बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय निवडला आहे.