प्रतिनिधी/ संगमेश्वर
तालुक्यातील धामापूर-करजुवे खाडीभागात बेकायदा वाळु उपसा सुरु होत असल्याचे ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत देवरुख तहसीलदार सुहास थोरात यांनी शुक्रवारी फुणगुस मंडल अधिकारी, पोचरी आणि करजुवे तलाठी व अन्य यांना सोबत घेत आज दुपारी 2 ते संध्याकाळी 6 च्या दरम्यान या परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत करजुवे आणि मांजरेतील दोन वेगवेगळे सेक्शन पंप आज बुडवून टाकले. यामुळे आगामी काळात बेकायदेशीर धंदा करु पाहणाऱया व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे.