प्रतिनिधी /काणकोण
मडगाव कारवार मार्गावरील करमल घाट वळणावर कारवारच्या दिशेने जाणारे केए.29 डी 6870 हे मालवाहू वाहन बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळ जवळ दोन तास खोळंबली. दुपारी 12 च्या दरम्यान ही घटना घडली होती. दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी काणकोणच्या पोलिसांनी अथक परिश्रम घेतले. रस्त्याच्या मधोमध हे वाहन बंद पडल्यामुळे कारवारच्या दिशेने जाणारी आणि मडगावच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने या ठिकाणी खोळंबून पडली होती