तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज एकूण ३४५ ॲंटिजेन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ३१ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्ती तपासणीमध्ये निगेटिव्ह आली असेल तरीही त्या व्यक्तीने इतरांशी संपर्क टाळावा, तसेच जे व्यक्ती तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज करमाळा शहरात घेण्यात आलेल्या २८१ ॲंटिजेन रॅपिड टेस्ट मध्ये १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या ६४ ॲंटिजेन रॅपिड टेस्टमध्ये ३० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ३४ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ५८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून त्यांना घरी सोडले आहे. सध्या ३४० जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४७ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून, मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर शासनाकडून नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
करमाळा शहरातील १७ कोरोनाबाधित –
महेंद्रनगर १ पुरुष
किल्ला वेस २ पुरुष, १ महिला
कानाडगल्ली २ महिला
संभाजीनगर २ महिला
फंड गल्ली १ महिला
गणेश नगर १ पुरुष
गुजरगल्ली १ महिला
शाहूनगर १ महिला
राशीन पेठ १ महिला
सिद्धार्थनगर १ महिला
कृष्णाजीनगर १ महिला
सुतारगल्ली १ पुरुष
एस.टी.कॉलनी १ पुरुष
ग्रामीण भागातील ३० कोरोनाबाधित –
गुळसडी १ पुरूष
देवीचामाळ १ महिला
जेऊर ३ महिला १ पुरुष
वीट १ पुरुष
पोथरे १ पुरुष
सरपडोह १ पुरुष
वाशिंबे १ पुरुष
वंजारवाडी २ पुरुष १ महिला
केम १ पुरुष
खांबेवाडी १ पुरुष
झरे १ पुरुष
जिंती ९ पुरुष २ महिला
चापडगाव १ पुरुष