औंध / प्रतिनिधी :
निगवे खालसा ता. करवीर येथील सुपुत्र क्रुपेश पाटील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कनिष्ठ हॉलीबॉल (पुरुष) संघाचे नेतृत्व करणार आहे.
वर्धमान (पश्चिम बंगाल) येथे 25 ते 30 डिसेंबर अखेर 46 वी राष्ट्रीय कनिष्ठ हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी चंद्रपूर येथे नुकतीच निवड चाचणी पार पडली. यामध्ये पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या सुपुत्राची त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. कुस्तीत देखील निगवे खालसा येथील मल्ल सोनबा गोंगाणे याने आंतरराष्ट्रीय पातळीवर गावाचे नाव उज्वल केले आहे.