प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून त्यासाठी 14 कोटी 98 लाख 82 हजार 486 रुपये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे करवीर तहसिल कार्यालयास लवकरच सुसज्ज इमारत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय गुरुवारी निगर्मित करण्यात आला आहे. यामुळे करवीर तालुक्यातील नागरिकांना सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशी प्रशासकीय इमारत लाभणार आहे. याच इमारतीतील करवीर पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी 73 लाख 23 हजार 898 इतका निधी गृह विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री पाटील यांनी सांगीतले.
गेल्या अनेक वर्षांपासून करवीर तहसिल कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवरती एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयास देखील खुरडÎाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारती मध्ये नविन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षा पासून केली जात आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यानी सहकार्य केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.