वाकरे/प्रतिनिधी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून करवीर तालुका पत्रकार संघाचा सन २०२० चा जीवनगौरव पुरस्कार तसेच करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना तर, दै.तरुण भारतचे गजानन लव्हटेंना करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक मेटील, उपाध्यक्ष युवराज पाटील, सचिव संजय पोवार यांनी दिली.
करवीर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा, विमा पत्र वाटप व भेटवस्तू वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार संभाजीराजे छत्रपती असणार आहेत. सत्कारमूर्ती व कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील तसेच उद्योजक रामचंद्र भोगम, अॅड. सी.बी.कोरे, सभापती आश्विनी धोत्रे, उपसभापती सुनील पोवार, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, माजी उपसभापती सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावर्षीचे करवीर भूषण उत्कृष्ट पुरस्कार प्रा.एम.टी शेलार (दै.पुढारी), शिवराज रामचंद्र लोंढे ( दै.लोकमत), प्रकाश रामचंद्र नलवडे ( दै. सकाळ), निलेश शामराव जाधव ( दै.पुण्यनगरी), बाजीराव वसंत तळेकर ( एस.न्यूज) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात ६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे असे आवाहन करवीर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.