कसबा बीड /प्रतिनिधी.
करवीर तालुक्यातील सावरवाडी येथे शनिवारी संध्याकाळी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे .बीडशेड येथील वेल्डिंग दुकानात अनेक जण संर्पकात आल्याने कोरोना आजाराची लागण झाली आहे . संर्पकात आलेल्या व्यक्तीना तपासणीसाठी कोल्हापुरच्या सीपीआर प्रशासनाकडे काल पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार यांनी पत्रकाद्वारे दिली .
ग्रामपंचायत मार्फत गावात तीन दिवस कडक लॉक डाऊन पाळण्यात येणार आहे . दुध संस्था , किराणा दुकान बाजार पेठ बंद ठेवण्यात येणार आहेत . गावातील मुख्य गल्ली बंद करण्यात आली . तीन दिवस गाव ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीतर्फ देण्यात आली .