ऑनलाईन टीम / कराची :
कराचीमधील गुलशन-ए-इक्बालमध्ये ‘मस्कन’ या इमारतीत झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा स्फोट एवढा भीषण होता, की स्फोटात मस्कन इमारतीच्या दोन मजल्यांची पूर्णतः मोडतोड झाली. शेजारील इमारतींच्या खिडक्यांचे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज एक किलोमीटर परिसरात पोहचला.
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, हा सिलिंडरचा स्फोट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.