ऑनलाईन टीम / कराची :
पाकिस्तानच्या कराचीत स्टॉक एक्सचेंजमध्ये चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चार दहशतवादी गोळीबार करत कराचीतील स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले. सुरुवातीला त्यांनी इमारतीच्या मुख्य गेटवर ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
पाकिस्तानी सैन्य घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या चकमकीत पाक सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती मिळत आहे.