क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
इंडियन कराटे संघटनाच्या वतीने कराटे विविध बेल्टची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 10 विद्यार्थी यलो तर 9 विद्यार्थी ग्रीन बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना बेल्ट प्रदान करण्यात आले.
इंडियन कराटे संस्थेच्या वतीने लेडीज क्लब कॅम्प येथे कराटे विद्यार्थ्यांची परीक्षा चेन्नईचे ग्रॅण्डमास्टर बी. एम. नरसिंहन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यलो व ग्रीनसह ब्लू, पर्पल, हायस्ट ब्राऊन बेल्ट प्रदान करण्यात आले. इशानवी साची पाटील, सानिका खटावकर, विहान राठोड, यशराज पाटील, प्रणव पाटील, नित्याश्री नंबुर, आयान शेख या विद्यार्थींना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ब्लॅक बेल्ट विक्रांत सुब्रम्हण्यमने पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते सर्व बेल्टधारकांना प्रमाणपत्र व बेल्ट देवून गौरव करण्यात आला. यावेळी संजय किल्लेकर, प्रसाद पाटील, आकाश पाटील आदी उपस्थित होते.