वार्ताहर/ कराड
तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहिद झालेले चिफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व भारतीय लष्करातील अधिकाऱयांना कराडकर नागरीकांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फौंडेंशनच्या वतीने शनिवारी सायंकाळी कृष्णा घाटावर श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय व छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने प्रितीसंगमाचा वाळवंट दुमदुमुन गेला.
भारतीय लष्कराचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 लष्करी अधिकाऱयांचे तामिळनाडु येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. या दुदैवी घटनेने संपर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या सर्व अधिकाऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फौंडेशनच्या वतीने शनिवारी सायंकळी कृष्णा घाटावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराडसह परीसरातील विविध क्षेत्रातील नागरीकांसह विद्यार्थांनी उपस्थीत रहात शहिद लष्करी अधिकाऱयांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी देशभक्तीपर गितांनी कृष्णा घाटावरील उपस्थीत भारावुन गेले. उपस्थीतांनी मेणबत्ती प्रज्वलीत करून श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी सामुदायीक वंदेमातरम म्हणन्यात आले.
यावेळी निवृत्त कर्नल विठ्ठल जगदाळे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तहसिलदार विजय पवार, डिवायएसपी डॉ,रणजीत पाटील, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, विद्या पावसकर, अंजली कुंभार, कराड वकिल संघटनेच्या अध्यक्षा ऍड. विद्याराणी साळुंखे, एनव्हायरो नेचर प्रेंड क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, मुकुंद चरेगावकर, आरूण जाधव, दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील, विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष आरूण जाधव, सचिव ऍड.संभाजीराव मोहिते, विनायक विभुते, विलासराव जाधव, चंद्रकांत जाधव व कराडकर नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.