प्रतिनिधी/ कराड
येथील समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने नरक चतुर्दशीला पहाटे सहा वाजता दिवाळी पहाट या शास्त्राrय गायन, नाटय़गीत व अभंग अशा सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मैफलीने कराडकरांची दिवाळी पहाट सुरिली झाली.
पुणे येथील डॉ. रेवा नातू यांचे गायन या कार्यक्रमा झाले. त्यांनी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित स्वरचित राग नरेंद्र सादर केला. अनेक अभंग व नाटय़गीतांसह ही मैफल पहाटे रंगली होती. कराडकरांनी या मैफिलीसाठी मोठी गर्दी केली होती. तबलासाथ विनायक हसबनीस आणि हार्मोनियम सारंग सांभारे त्याचप्रमाणे साईड रिदम दिलीप आगाशे व गायन साथ नियती आपटे यांनी केली.
या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी नगरसेवक सौरभ पाटील, मुकुंद चरेगावकर, घनःश्याम पेंढारकर, डॉ. मिलिंद पेंढारकर, डॉ. अजय ब्रम्हनाळकर यांच्यासह कराडकर रसिक उपस्थित होते. संस्थेचे संचालक प्रशांत कुलकर्णी यांनी कलाकारांची ओळख करून दिली. संचालक अरुण प्रभुणे, ऍड. विक्रम कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत साने, सौ. पी. डी. कुलकर्णी, विनिता पेंढारकर, अवधूत कुलकर्णी यांनी मान्यवर व कलाकारांचा सन्मान केला. संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. प्रतिवर्षी हा दिवाळी पहाट कार्यक्रम संस्थेतर्फे करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कराड शहरातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले, असे सचिव ओंकार रामचंद्र आपटे यांनी सांगितले.