प्रतिनिधी / कराड
कृष्णा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 11 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सोमवारी टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आगाशिवनगर येथील 25 व 27 वर्षीय युवक व 65 वर्षीय वृद्ध गृहस्थ, वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय पुरुष, कापील येथील 11 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय गृहस्थ, कामेरी येथील 48 वर्षीय पुरुष, मिरेवाडी-फलटण येथील 28 वर्षीय युवक यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यापूर्वी 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाला हरविणार्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर्स व स्टाफ उपस्थित होता.