प्रतिनिधी/ कराड
कराडच्या तहसीलदारपदी विजय पवार यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी त्यांचे स्वागत केले.
येथील तहसीलदार अमरदीप वाकडे यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तहसीलदार पदावर बदली झाली. त्यांच्या बदलीने रिक्त असलेल्या जागेवर पवार यांची नियुक्ती झाली. दरम्यान गेल्या वीस दिवसांपासून प्रभारी तहसीलदार म्हणून आनंदराव देवकर यांच्याकडे पदभार होता. देवकर यांनीही प्रभारी तहसीलदार म्हणून उल्लेखनीय केले आहे. तालुक्यात ई-पीक नोंदणी करण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने सुरू आहे. पवार चंद्रपूर जिह्यातील ब्रह्मपुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची कराड येथे बदली झाली. त्यांच्या नोकरीचा आजपर्यंतचा कार्यकाल विदर्भात झाला आहे. आर्वी येथेही तहसीलदार म्हणून त्यांनी काम केले आहे. पवार यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यात असून कराड तहसीलदार म्हणून पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात आले आहेत. आज त्यांनी येथील तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी देवकर यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचाऱयांनी स्वागत केले.