प्रतिनिधी/ कराड
कोरोनावर मात केलेल्या येथील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या पुन्हा जनसेवेसाठी सक्रीय झाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनी नगरपालिकेतील ध्वजारोहण नगराध्यक्षांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी शांतता समितीच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा कोविड 19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू होते. 1 जुलैला त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्या घरीच होत्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये गणेशोत्सवासंदर्भात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीस नगराध्यक्षांनी उपस्थिती लावली. स्वातंत्र्यदिनी नगरपालिकेतील ध्वजारोहण नगराध्यक्षांच्या हस्ते झाले. त्यामुळे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या कोरानावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा जनसेवेसाठी सक्रीय झाल्या आहेत.