प्रतिनिधी / सातारा
कराड व मलकापूर मधील सायकलप्रेमींनी सायक्लेथॉन (सायकलींग) स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (दि.१६) रोजी या स्पर्धा होणार आहेत. या सायक्लेथोन स्पर्धा ५० की.मी. ची सायकलिंग स्पर्धा व २० किमी.ची फन राईड ह्या दोन गटामध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा दोन वर्गात होणार आहे. ५० किमी. चे स्पर्धेची प्रवेश रक्कम रु.१००० असून ती स्पर्धा सकाळी ६ वाजता आगाशिवनगर (इमर्सन गेट क्र.२) येथून निघणार असून, ती कराडच्या दिशेने जाऊन मलकापूर फाटा येथून देवेवाडीच्या दिशेस जाऊन ती पुन्हा आगाशिवनगर (इमर्सन गेट क्र.२) येथे समाप्त होईल. तसेच २० किमी. च्या फन राईडसाठी प्रवेश रक्कम रु. ४०० असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास टी–शर्ट, वेग, मेडल व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेमधील प्रथम तीन विजेत्यांना रोख बक्षीस अनुक्रमे रु.११,१११/-, ७.७७७/- व ५,५५५/- दिली जाणार आहेत. तसेच विविध तीन वय गटात प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.