वार्ताहर /कराड
कराड शहरासह तालुक्यात लसिकरण मोहिमेला गती आली असुन आत्तापर्यत तालुक्यातील 3 लाख 7 हजार नागरीकांचे लसिकरण पुर्ण झाले आहे. यात 2 लाख 17 हजार 752 नागरीकांचा पहिला व 89 हजार 284 नागरीकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. तालुक्यातील सर्वच केंद्रावर मोठयाप्रमाणात लस उपलब्द होत असल्य़ाने केंद्रावरील गर्दी व गोंधळ कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. नागरीकांनी लसिकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.
कोरोनासाठी सुरवातीपासुनच हॉटस्पॉट ठरलेल्या कराडला गेल्या पंधरा दिवसांपासुन चांगला दिलासा मिळत आहे. सध्या दररोज शंभरच्या आत नविन बाधित आढळत आहेत. मात्र ही बाधित वाढ शुन्यावर आणन्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवार आखेर कराड तालुक्यात एकुण 36 हजार 893 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 35 हजार 359 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 714 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 820 रूग्ण विविध रूग्णालय व कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केद्रांसह 64 उपकेंद्र, उपजिल्हा रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामिण रूग्णालय व खाजगी रूग्णालयाच्या केंद्रावर लसिकरण मोहिम सुरू केली आहे. प्रारंभी अपुऱया लस परवठयामुळे लसिकरण केंद्रावर मोठयाप्रमाणात गर्दी होऊन गोंधळाची परीस्थीती निर्मण होत होती. मात्र सध्या सर्वच लसिकरण केंद्रावर मोठयाप्रमाणात लस उपलब्द होत असल्याने केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. नागरीकांनी लसिकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
बेफिकीरांची संख्या वाढली
कराड शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढ मंदावली असल्याने दिलसा मिळत आहे. मात्र याचा गैरफायदा घेणाऱयांची संख्याही वाढल्याचे पहावयास मिळत आहे. कराडसह मलकापुर, विद्यानगर व ओगलेवाडी परीसरात विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली आहे. तर अनेक दुकानांतुन सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. पोलिस, महसुल, नगरपालिका व ग्रामपंचायतीनी अशा बेफिकीर लोकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.