बिबट्याला वाहनाची किरकोळ धडक
कराड / प्रतिनिधी :
कराड तालुक्यात बिबट्याचा वावर पुन्हा वाढला असून, मंगळवारी रात्री पाचवड फाटा ता. कराड बिबट्या चक्क महामार्गावर अवतरला. भरधाव वाहनांच्या गोंगाटात बिबट्या महामार्गाच्या कडेला काही वेळ बसूून होता. बिबट्याला एका वाहनाची किरकोळ धडक बसल्याचेही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील बिबट्याचे दर्शन झाले. तो बिबट्या महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असावा. बिबट्याला महामार्गावरून निघालेल्या वाहनाची धडक बसल्याने तो पुन्हा माघेे फिरला. तो बराचवेळ महामार्गाच्या कडेला बसला होता. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी बिबट्या रस्ता ओलांडणार या शक्यतेने वाहनांना वेग कमी करण्यास सांगितले होते. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी बिबट्याला पाहिले. काही स्थानिक नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. मात्र, तोपर्यंत बिबट्याने धुम ठोकली होती.