उंडाळेजवळ काम सुरू असलेल्या पुलावरून कोसळली दुचाकी
उंडाळे : बांधकाम सुरु असलेल्या पुलावरून दुचाकी पडून दोन तरुण ठार झाले. तर एक जण जखमी झाल्याची घटना उंडाळेजवळ रविवारी रात्री घडली.
जानु भैरु झोरे व कोंडीबा भागोजी पाटने रा.भेंडवडी (ता. हातकणंगले, जि कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. जखमी दगडू बिरू झोरे याच्यावर कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कराड रत्नागिरी रोडवरील उंडाळे गावाजवळ पुलाचे बांधकाम चालु असल्याने या रोडवरील वाहतूक बंद आहे. मात्र रस्ता व्यवस्थित न अडवल्याने मोटरसायकलस्वार सरळ पुलावर गेले. रात्री अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी पुलावरून खाली पडली. यात दोघांचा बळी गेला. तर एक जखमी आहे. यासंदर्भात अधिक तपास कराड पोलीस करत आहेत.