प्रतिनिधी / कराड
सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आज कराड तालुक्यातील विविध गावांतील चौघेजण कोरोनामुक्त झाले. कृष्णा मेडिकल कॉलेज येथून त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला.
म्हासोली ता. कराड येथील 32 व 33 वर्षीय पुरुष, नंदगाव येथील 22 वर्षीय युवक, शामगाव येथील 22 वर्षीय युवक यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 147 जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.