कराड परिसरात टवाळखोरी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी कारवाईचा हिसका दाखवला. डिवायएसपी अमोल ठाकूर यांनी स्वतः टवाळखोरांचा शोध घेत अचानक त्यांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढून कारवाई केली. या कारवाईचे महिला, मुलींसह सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अशा पद्धतीने महिला, मुलींची कोणी छेड काढत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव अगदी गोपनीय ठेवून टवाळखोरांना धडा शिकवला जाईल असे डिवायएसपी ठाकूर यांनी आवाहन केले आहे.