प्रतिनिधी /बेळगाव
राजस्थान कोटा येथील करिअर पॉईंट या कंपनीची नूतन शाखा बेळगाव येथे सुरू झाली आहे. सदर कंपनी आयआयटी, जेईई व नीट अशा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. बेळगाव शाखेचे उद्घाटन काडाचे प्रशासक शशीधर कुरेर, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शाखेला शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे यावेळी शशीधर कुरेर यांनी सांगितले. करलिंगण्णावर यांनी अशी स्पर्धा परीक्षा केंदे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी राज बेळगावकर, डॉ. रवी पाटील, डॉ. वीरेश किवडसण्णावर यांनी शाखेला शुभेच्छा दिल्या. शाखेचे संचालक भालचंद्र पाटील यांनी स्वागत करून संस्थेची माहिती दिली. 8 वी ते पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना येथे शिक्षण दिले जाते, असे त्यांनी सांगितले.
सदर संस्था 1993 मध्ये सुरू झाली. आजपर्यंत संस्थेने लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून ते विविध व्यवसाय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.