बंगालमध्ये विमानतळावर पोहोचताच झाली भेट
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींनी येथे बागडोगरा विमानतळावर पद्मश्री पुरस्कार विजेते करीमुल हक यांची भेट घेतली आहे. दोघांनीही परस्परांना विमानतळावर अत्यंत उत्साहाने गळाभेट घेतली आहे. समाजसेवक करीमुल हक यांना पश्चिम बंगालमध्ये बाइक ऍम्ब्यलुन्स दादा या नावानेही ओळखले जाते.
4000 जणांचा वाचविला जीव
करीमुल हक यांनी स्वतःच्या बाईक ऍम्ब्युलन्सने आतापर्यंत सुमारे 4 हजार जणांचा जीव वाचविला आहे. हक आजारी असलेल्या गरीब आणि वंचित लोकांना स्वतःच्या बाइक ऍम्ब्युलन्सवरून मोफत रुग्णालयात पोहोचवितात. चहाच्या मळय़ांमध्ये काम करणाऱया हक यांनी अपुऱया ग्रामीण आरोग्य सेवांमुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्याचा निश्चय करत मोफत बाइल ऍम्ब्युलन्स सेवा सुरू केली.
हक यांच्यावर पुस्तक
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करीमुल हक यांची शेकडो लोकांना प्रेरित करणाऱया कहाणीवर पुस्तकही लिहिले गेले आहे. ‘बाइक ऍम्ब्युलन्स दादा, द इन्सापयरिंग स्टोरी ऑफ करीमुल हक ः द मॅन हू सेव्ड 4000 लाइव्हस’ हे हक यांचे अधिकृत आत्मचरित्र आहे. पत्रकार तसेच सामाजिक उद्योजक विश्वजीत झा यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
26 वर्षांपूर्वी आईचे निधन
हक यांनी सुमारे 26 वर्षांपूर्वी रुग्णवाहिकेचा खर्च पेलू न शकल्याने स्वतःच्या आईला गमाविले होते. त्या काळात त्यांच्या आईला रुग्णालयात नेण्यासाठी अन्य कुठलीच सेवा उपलब्ध नव्हती. पण हक यांच्या एका सहकाऱयाची प्रकृती बिघडली असता त्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती दिलेली नाही.