12 तोळे सोन्याचे दागिने, साडेसात लाखाची रोकड लंपास : दोन्ही गावात दहा ठिकाणी चोरी : पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
प्रतिनिधी / चिकोडी
चिकोडी तालुक्यातील करोशी आणि कमतेनट्टी येथे रात्रीत दहा ठिकाणी चोरी कऊन सुमारे 14 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. करोशी येथे 6 ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी सुमारे 7.20 लाख ऊपयांची रोकड व 12 तोळे सोने तर कमतेनट्टी येथे 4 ठिकाणी चोरी करून सुमारे 20 हजार ऊपये रोकड व काही सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीच्या घटनांमुळे करोशी आणि कमतेनट्टीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, करोशी येथील विशाल पांढरे कुटुंबीय चिकोडी येथे उपचारासाठी दवाखान्याला गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून 7 लाख ऊपये रोकड व 12 तोळे सोने तसेच इंदू सिरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून 12 हजार ऊपये रोकड व अर्धा तोळे सोने, युसूफ पटेल यांच्या दुकानातील 8 हजार ऊपये लंपास केले. तसेच तानाजी बामणे, अशोक बामणे, बाळू भोरे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री 6 जण अज्ञात चोरटे करोशीमध्ये आल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसापासून अनाथ आश्र्रमासाठी देणगी मागण्यासाठी काहीजण करोशी गावात फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यांनीच ही चोरी केल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. करोशीतील बामणे प्लॉट तसेच गावातील काही ठिकाणी चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यानी दोन घरांना जाताना कुलूप लावून चावी घेऊन गेल्याचा प्रकारही उघडकीस आला.
चोरीची घटना समजतात आलेल्या घरमालकांनी चोरी झाल्याचे पाहून आक्रोश व्यक्त केला. चोरी झालेल्या घरासमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. कमतेनट्टी येथेही 4 ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यात एका ठिकाणी 15 हजार ऊपये व काही सोने लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक बसवराज एलिगार, पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, पोलीस एस. पी. गलगली व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. चिकोडी पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे.