वॉशिंग्टन
दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश तसेच अमानवीय कृत्ये आणि प्रचंड वेगाने वाढत जाणाऱया महागाईला तोंड देणाऱया पाकिस्तानची स्थिती बेताची झाली आहे. देश सध्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे दिसून येत आहे. अशा संकटातून सावरण्यासाठी पाकिस्तान कधी आशियाई विकास बँक तर कधी शेजारील इस्लामिक देश यांच्याकडे मदतीसाठी हात पसरत राहायचा. परंतु आताच्या घडीला मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील वर्तमानपत्र द डॉन यांनी याबाबतची माहिती नुकतीच दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार पाकिस्तानला येणाऱया काही दिवसांमध्ये सदरची रक्कम मंजुर करुन देण्यात येणार असल्याचे समजते. या अगोदरही आयएमएफने 600 कोटी डॉलरचे कर्ज मंजुर केलेले आहे.