गारगोटी : प्रतिनिधी
मडीलगे बुद्रुक(ता.भुदरगड)येथील शेतकरी काकसो विष्णू पाटील-शेणवी (वय ६५ )यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली.याबाबत ची वर्दी दत्तात्रय पाटील यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.
अधिक माहिती अशी मडीलगे येथील काकासो पाटील यांच्यावर दत्तनागरी पतसंस्था,गावातील सोसायटी आणि निपाणी येथील फुलट्रॉन फायनान्स कंपनीचे असे एकूण अकरा लाख रुपयांचे कर्ज आहे.त्यांना चार दिवसांपूर्वी दत्त नागरी पतसंस्थेच्या कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीच्या लिलावाचे पत्र आले.त्यावेळेपासून ते मानसिक तणावाखाली होते.कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग नाही आणि जमिनीचा लिलाव होणार हा मानसिक धक्का त्यांना बसला होता.
आज बुधवारी (दि.९)रोजी घरातील सर्व माणसे कामानिमित्त दुसऱ्या शेतात गेली होती. ते दुपारी बाराच्या सुमारास घरी कोणी नसल्याने दाराला कडी लावून घरालगत असलेल्या कामत नावाच्या शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली.ते झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसल्यावर शेजारच्या शेतात काम करणाऱ्या माणसांनी घरच्यांना ही बातमी दिली.घरातील माणसांनी त्यांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचाराप