सवलतीचा कालावधी सहा महिन्यांचा करण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांनी सरकार आणि आरबीआय यांच्याकडे एक प्रस्ताव दाखल केला आहे. यांच्या प्रस्तावानुसार आर्थिक समस्यांचा सामना करत असणाऱया विविध क्षेत्रांना कर्जांची परतफेड करण्यासाठी आणखी जादा कालावधीसाठी सवलत मिळावी अशी मागणी केली आहे.
यामध्ये लहान आणि मध्यम उद्योगांना पेडिट गॅरेंटी आणि वन टाईम लोन रिस्ट्रक्चरिंगची सुविधा देण्यासाठीची मागणी केली आहे. तसेच ही सवलत तीन महिन्यांऐवजी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याची विनंती केल्याची माहिती पीटीआय सुत्रांनी दिली आहे. यासोबतच बिगर बँकिंग आर्थिक कंपन्यांनाही सवलत मिळण्याची सुचना यावेळी केली आहे.
सध्याला सर्वच क्षेत्रांना संकटाचा सामना करावा लागतो आहे. उत्पन्नही सध्या थांबले असल्याने उद्योगासाठी पैशाची निकड अधिक लागणार आहे. तेव्हा शआ काळात आयबीएची ही मागणी रास्त आहे. परंतु तज्ञांच्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कर्जाचे रिस्ट्रक्चरिंग करता येणे शक्मय नसल्याचे म्हटले आहे. तसेच विविध प्रकारची थकबाकी अगोदरच थकीत झालेली असते. तसेच विविध उद्योग संघटनांच्या अहवालाच्या आधारे एक प्रस्ताव तयार केला आहे. ही यादी सरकार आणि आरबीआय यांच्याकडे सादर करण्यात आली असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.