ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कर्जबाजारी पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोरोनामुळे आणखी खालावली आहे. 500 अब्ज रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी पाकिस्तान आता देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी गहाण ठेवणार आहे. पाकच्या डॉन या वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इस्लामाबादमधील एफ नाईन सेक्टरधील फातिमा जिन्ना पार्क आहे. 759 एकरांमध्ये पसरलेले हे पार्क जिन्ना यांच्या स्मृतीप्रत्यर्थ बांधण्यात आले असून, ते जिन्ना यांची बहीण मदार-ए-मिल्लत फातिमा जिन्ना यांच्या नावाने आहे. हे पार्क जिन्ना यांची ही निशाणी पाकिस्तान कर्ज मिळवण्यासाठी गहाण ठेवणार आहे. हे पार्क लोकांच्या मनोरंजनासाठी आहे.
कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाला हातभार लावण्यासाठी हे पार्क गहाण ठेवावे की, नाही यावर उद्या (दि.26) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार आहे.