प्रतिनिधी/ रत्नागिरी
कर्ज देण्याच्या बहाण्याने तरूणाला तब्बल 9 लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी महेश गोविंद बाणे (45, शिरगांव-तिवंडेवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांना मोबाईलवर 18 ऑक्टोबर 2020 रोजी नितीन पाटील नावाच्या इसमाचा फोन आला. पाटील याने तुम्हांला बजाज फायनान्स व अलियान्स लाईफ लाँग या कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवल़े खात्री पटावी म्हणून प्राची देसाई, संतोषी हेरडे व अशोक म्हात्रे नावाच्या इसमांकडून त्यांना फोन करून कर्जाविषयी माहिती देण्यात आल़ी
आपल्याला कर्ज मिळणार, अशी खात्री पटल्यानंतर महेश यांनी कर्जासाठी पुढील बोलणी सुरू केल़ी यावेळी नितीन पाटील व सहकाऱयांनी महेशला फोन करून पॉलिसी कर्ज हप्त्यासाठी 90 हजार व टॅक्ससाठी 4 लाख 14 हजार रूपयांची मागणी केल़ी यावर विश्वास ठेवून महेश यानी 18 ऑक्टोबर ते 12 डिसेंबर या काळात ही रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यात जमा केल़ी महेश यांच्या मित्रानेही 3 लाख 57 हजार 361 रूपये पाटील याने सांगितलेल्या खात्यामध्ये जमा केले.
या व्यवहारात सुमारे 9 लाखांची रक्कम जमा करूनही कर्ज न मिळाल्याने महेश यांनी नितीन पाटील याला विचारणा करण्यास सुरुवात केल़ी मात्र समोरून उडवाउडवीची उत्तरे येवू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे महेश याच्या लक्षात आल़े त्यामुळे त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नितीन पाटील, प्राची देसाई, संतोषी हेरडे, अशोक म्हात्रे नावाच्या इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वांगणेकर करत आहेत़