वडगाव येथील दाम्पत्याविरुद्ध एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिकेतून कर्ज मिळवून देण्याचे सांगून एका वृद्ध महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मलप्रभानगर-वडगाव येथील दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर-वडगाव येथील पद्मावती विठ्ठल बुचडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंजुळा यशवंत ढवळी, यशवंत पांडुरंग ढवळी (रा. मलप्रभानगर, वडगाव) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.
बेळगाव महानगरपालिकेतून कर्ज मिळवून देण्याचे सांगून मंजुळा व यशवंत या दोघांनी पद्मावती आणि त्यांच्या मुलीकडून 1 लाख 95 हजार रुपये घेतले आहेत. कर्ज तर नाहीच. घेतलेले पैसेही परत केले नाहीत. म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.